🌾 *कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा - येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याची रक्कम*
📝 पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानसभेत केली.
👉 *पहा काय म्हणाले कृषिमंत्री*
● पीक विम्याचे एकूण ६३ लाख ११ हजार २३५ लाभार्थी आहेत. त्यानुसार ५० लाख, ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई मिळाली आहे.
● मात्र ५०३ कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम प्रलंबित असून ती पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
● तसेच सरकारने पीक विम्यासाठी केवळ एक रुपयांत नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तीन हजार ३१२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
● तर सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार ३४२ कोटी रुपये बँक खात्यात जमा केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
😇 *पुढील १५ दिवसात शेतकयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार* - हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा.

0 टिप्पण्या